पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग सक्षम करा- पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग साधन सामुग्रीसह सक्षम करावा यासाठी लागणारी मशनरी तातडीने खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी दिले. ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी शहरातील नाले सफाईबाबतचा सुरवातीला आढावा घेतला. मुख्य आरोग्य निरिक्षक यांनी महापालिकेने आजअखेर केलेल्या नालेसफाई कामाची माहिती दिली. आरोग्य विभागाने नाले सफाई करुनही नागरीकांच्या तक्रारी का येत आहेत. आरोग्य विभागाकडे साधन सामुग्री कमी असल्यास जीएम पोर्टलवरुन तातडीने आवश्यक ती साधने खरेदी करण्यात यावीत. आरोग्य विभागाने कचरा उठावासाठी छोटे डंपर, टिप्पर, टॅक्टर, जेसीबी, स्विपिंग मशीन व इतर आवश्यक साधने पावसाळयापुर्वी खरेदी करावीत. ६ प्रभागासाठी १ ट्रॅक्टर याप्रमाणे १६ टॅक्टर कचरा व पालापाचोळा गोळा करण्यासाठी खरेदी करावा. मुख्य चौकात व गर्दीच्या ठिकाणी असलेले कंटेनर खराब झाले असल्यास त्याठिकाणी दुसरा कंटेनर ठेवा. खराब झालेल्या कंटेनरच्या ठिकाणी टॅक्टर ट्रॉली लावावी. या ट्रॉलीमधून दोन शिफ्टमध्ये कचरा उठाव करण्यात यावा. यासाठी प्रायोगित तत्वावर सीबीएस स्टॅन्ड व पर्ल हॉटेल येथे टॅक्टर ट्रॉली लावावी. अंबाबाई मंदीरात दर्शनासाठी बाहेर गावाहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे मंदीर परिसरातील सर्व रस्ते स्वच्छ असले पाहिजेत. यासाठी या परिसरातील कचरा उठाव व स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांचे फिरते पथक नेमावे. या कर्मच्याऱ्यांनी मंदीर परिसरातील रस्त्यावरील कचरा वेळोवळी उचलावा. घाटी दरवाजा जवळ फूल विक्रेत्यांचे वेस्टेज टाकण्यासाठी तेथेही एक ट्रॉली लावावी. याठिकाणी ट्रॉलीमध्ये कचरा टाकण्यासाठी फुलविक्रेत्यांना सूचना द्याव्यात. प्रत्येक प्रभागामध्ये किती कर्मचारी काम करतात याबाबतचे ॲप तयार करावे. प्रभागातील नागरीकांना आपल्या भागात किती लोक काम करतात हे कळाले पाहिजे याबाबतचे नियोजन करा. स्मशानभूमीकडे जमा होणारे लाकूड त्याठिकाणीच कटिंग केले जाते. त्यामुळे स्मशानभूमीच्या रस्त्यावर गर्दी होते. यासाठी दान स्वरुपात जमा होणारी लाकडे, ओंडके बुध्दगार्डन अथवा बंदिस्त ठिकाणी जमा करुन घ्यावीत. त्याठिकाणीच त्याचे कटिंग करावे. त्यानंतर स्मशानभूमीत शेडमध्ये कटिंग केलेली लाकडे ठेवण्यात यावीत. उर्वरीत नाले सफाई लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

Advertisements

  उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापालिकेच्यावतीने कचरा व पालापाचोळा उठावासाठी १६ टॅक्टर खरेदी करण्याचे नियेाजन केले आहे. त्याचबरोबर हॉटेलमधील वेस्टेज गोळा करण्यासाठी ४ कार्गो डंपर, ४ डंपर, ४ जेसीबी व 1 स्विपींग मशीन खरेदी करण्यात येणार असलेचे सांगितले. हे सर्व साहित्य १० दिवसात जीएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात येणार असलेचे सांगितले.

  उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापालिकेच्यावतीने कचरा व पालापाचोळा उठावासाठी १६ टॅक्टर खरेदी करण्याचे नियेाजन केले आहे. त्याचबरोबर हॉटेलमधील वेस्टेज गोळा करण्यासाठी ४ कार्गो डंपर, ४ डंपर, ४ जेसीबी व १ स्विपींग मशीन खरेदी करण्यात येणार असलेचे सांगितले. हे सर्व साहित्य १० दिवसात जीएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात येणार असलेचे सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैदयकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *