Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त: शिवाजी शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१७ : गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे ‘वाय’ (Y the Film) सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर २४ जूनला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मात्र त्या आधी सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भटीला आला आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाल्या ‘वाय’ हा मराठीतील पहिला हायरलिंक सिनेमा असून मराठीत होऊ पाहणाऱ्या या नव्या प्रयोगासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी सिनेमात दाखवण्यात येणार आहे. मल्टिस्टारकास्ट असलेल्या सिनेमात भायण वास्तव समोर येणार आहे. धक्कादायक घडणाऱ्या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत. ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत.
सिनेमात मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका आहे. ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, ट्रेलरमध्ये मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत.या घटनांचा शोध मुक्ता यात घेताना दिसतेय.
या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. ट्रेलरमधून इंटरेस्टिंग गोष्ट प्रेक्षकांसमोर आली आहे. आता मुक्ताला या शोधात यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.सिनेमात मुक्ताबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक हे कलाकार आहेत. त्याचप्रमाणे रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकारही आहेत.
अजित सूर्यकांत वाडीकर यांनी सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन केलं आहेत. तर कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्सनं सिनेमाची निर्मित केली आहे. ‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे..