दहावीच्या परीक्षेत दिव्याचे घवघवीत यश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुलगा हाच वंशाचा दिवा नसून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते आणि मुली देखील कर्तुत्वान असतात असे प्रबोधन आपल्या वक्तृत्वातून करणाऱ्या गाडेगोंडवाडी (ता.करवीर) येथील दिव्या दीपक मेटिल या विद्यार्थिनीने तिच्या भाषणातील विचारांप्रमाणे स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. आज लागलेल्या दहावीच्या निकालात दिव्याने ९२ टक्के गुण मिळवत एकुलती एक मुलगी देखील कर्तुत्ववान असते हे दाखवून दिले आहे. ती देवाळे (ता. करवीर) येथील न्यू हायस्कूलची सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी आहे. वडील दीपक मेटिल शेतकरी असून लोकमत साठी अर्धवेळ बातमीदार म्हणून काम करतात व आई अर्चना या गृहिणी असून वडिलांसोबत शेतीच्या कामात मदत करतात. लहानपणापासून अभ्यास आणि वक्तृत्वात विशेष गती असणारी दिव्या हि तिच्या आई-वडिलांचं एकुलते एक अपत्य आहे. गेली अनेक वर्षे विविध वक्तृत्व स्पर्धांमधून लेक वाचवा या विषयावर ती प्रबोधनपर भाषणे देत आहे. पण ती आपले विचार फक्त भाषणांमधून समाजाला सांगत नाही तर खरोखर मुली या कर्तुत्ववान व गुणवान असतात हे तिने तिच्या कृतीने देखील सिद्ध केले आहे. मुलगा हाच वंशाचा दिवा हा असतो, फक्त एक आपत्य आणि ती देखील मुलगी मग तिला कशाला शिकवा या गैरसमजूतीतून मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक आई-वडिलांचे डोळे आज लागलेल्या दहावीच्या निकालातील मुलींची गुणवत्ता बघून उघडले असतील. वंशाला मुलगाच हवा असा अट्टाहास करणाऱ्या अनेकांना दिव्याच्या आजच्या निकालाने विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.

आता हि तर फक्त सुरुवात असून भविष्यात एमबीबीएस चे शिक्षण घेवून स्वतःला आणखी सिद्ध करायचे आहे अशी भावना निकलानंतर दिव्याने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *