Media Control Online
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली आहे. प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड विधानपरिषद निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. सेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणूक लढवत आहे. यातील लाड विरुद्ध भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
Advertisements

