धक्कादायक : सांगलीतील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी केली आत्महत्या ….!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर

सांगली/प्रतिनिधी  : आर्थिक विवंचनेतून सांगली येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली आहे .सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये मधील ही  धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो आहे  संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे.

Advertisements

आतम्हत्या  केलेल कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.

ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर प्रकार समोर

अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.

 आत्महत्या का केली?

आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

 

मृतांची नावं पुढीलप्रमाणे

डॉक्टर माणिक येलाप्पा वनमोरे

आक्काताई वनमोरो, माणिक वनमोरे यांची आई

रेखा माणिक वनमोरे, माणिक वनमोरे यांची बायको

प्रतिमा वनमोरे, माणिक वनमोरे यांची कन्या

आदित्य वनमोरे, माणिक वनमोरे यांचा मुलगा

पोपट येलाप्पा वनमोरे, माणिक वनमोरे यांचे सख्खे भाऊ

अर्चना वनमोरे, पोपट वनमोरे यांची पत्नी

संगिता वनमोरे, पोपट वनमोरे यांचा यांची मुलगी

शुभम वनमोरे, पोपट वनमोरे यांचा मुलगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *