Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
Media Control Online
भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, असा नियम आहे. मात्र लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याऐवजी दुसऱ्याने त्यांची मतपत्रिका मतपेटीत टाकल्याने त्यांचं मत बाद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरकडे तशी तक्रार केली आहे. तसेच आपल्या तक्रारीचा निवडणूक आयोगाला मेलही केला आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणी देखील लांबते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Share Now