Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
Media Control Online
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. यामध्ये भाजपचे चारही उमेदवार पहिल्याच फटक्यात विजयी झाले आहेत. भाजपचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे हे पहिल्याच पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आले. भाजपने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार दरेकर, खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपला फक्त पाचव्या जागेच्या निकालाची प्रतिक्षा आहे. विधानपरिषदेच्या पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड रिंगणात आहेत. ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेशी मतं नसल्याने या जागेचा निकाल काय लागणार, हे पाहावे लागेल
Share Now