राजकीय भूकंप Live Updates : एकनाथ शिंदे गुजरात मध्ये घेणार पत्रकार परिषद..!

Media Control Online

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असून भाजपच्या संपर्कात असल्याचे तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आज दुपारी बारा वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisements

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सध्या ११ आमदारांसोबत सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं. त्यामुळं शिवसेनेकडून आमदार शिंदे यांना सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. मात्र, शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल लागत असून त्यामुळं महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

एकनाथ शिंदे हे आज दुपारी गुजरातमधून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसंच, आजच्या पत्रकार परिषदेतून ते कोणते मुद्दे मांडणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *