राजकीय भूकंप Live Updates : अमित शहा शिवसेना आमदारांची भेट घेण्याची शक्यता ?

Media Control Online 

शिवसेनेचे २० पेक्षा अधिक आमदार गायब असल्याने पक्ष फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना आमदार नाराज असल्याने त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होणार असून सरकारच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सर्व आमदारांची भेट घेतील, अशी माहिती समोर येत आहे.

Advertisements

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले इतर शिवसेना आमदार सध्या सुरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. हे आमदार पुढील काही तासांत अहमदाबाद शहरात जातील आणि तिथे त्यांची अमित शहा यांच्यासोबत भेट होईल, असे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *