राजकीय भूकंप Live Updates : कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर ‘नॉटरिचेबल’.

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १५ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भुदरगड- राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर देखील ‘नॉटरिचेबल’ झाले आहेत.

Advertisements

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी जवळपास पंधरा आमदार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सध्या संजय रायमुलकर, संजय गायकवाड, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, महेंद्र दळवी, शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, प्रदीप जयस्वाल या शिवसेना आमदारांचे फोन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये किती आमदार उपस्थित राहतात हे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *