Media Control Online
‘धर्मवीर’ या सिनेमातील एक व्हिडिओ देखील मीम स्वरुपात एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक या अभिनेत्याच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘कुठे आहे एकनाथ?’ हाच डायलॉग वापरुन त्यापुढे एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असण्यापासून ते महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार यासंदर्भात अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
