Share Now
Media Control Online
विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्यानं चिंतेत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ आमदार नॉट रिचेबल आहेत. ते सध्या गुजरातच्या सूरतमध्ये वास्तव्याला आहेत. शिवसेनेनंतर आता काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे ५ आमदार नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे २१ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. यातले काही जण ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर काँग्रेसनं धसका घेतला आहे. काँग्रेसनं आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. त्यासाठी सगळ्या आमदारांशी संपर्क साधण्यात आला. मात्र ५ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजतं. त्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार झटका बसताना दिसत आहे.
Share Now