डॉ. तात्याराव लहाने , डॉ. जनार्दन वाघमारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ वितरण…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 2 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक दिग्गजांना आजवर शाहू पुरस्कार प्रदान केला आहे. डॉ. जनार्दन वाघमारे आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कार दिल्यामुळे राजर्षी शाहू पुरस्काराची उंची वाढत आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते.

भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणारे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी केले. केवळ २८ वर्षांच्या कारकिर्दीत २८० वर्षांचे कार्य त्यांनी केले. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य इतके मोठे आहे की कितीही पुस्तके लिहिली तरी शाहू राजांच्या कार्याचे वर्णन पूर्ण होणार नाही.विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन आजवर सन्मानित करण्यात आले आहे. राजर्षी शाहू पूरस्कारार्थी डॉ. वाघमारे व डॉ. लहाने यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. 

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना अनेक उपक्रम सुरु केले. यापैकी गुणवत्ता वाढीचा ‘लातूर पॅटर्न’ हा उपक्रम राज्यभर प्रसिध्द आहे. शिक्षण, समाजप्रबोधन, राजकारण, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रात डॉ. वाघमारे यांचे कार्य महत्वपूर्ण आहे.

एड्स रुग्णाच्या डोळ्यांची पहिली शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने यांनी केली असून तब्बल ५० लाख लोकांचे डोळे त्यांनी आजवर तपासले आहेत. कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जडणघडणीत डॉ. लहाने यांचा मोठा वाटा आहे. इतके मोठे कार्य करणाऱ्या दोन्ही मान्यवरांची समितीने पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही केला जाईल हा विश्वास आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावार, डॉ.तात्याराव लहाने यांच्या पत्नी सुलोचना लहाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास तज्ञ तथा ट्रस्ट चे सदस्य डॉ. जयसिंगराव पवार, डॉ.अशोक चौसाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, कार्यकारी अभियंता संजय पाटील, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *