Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
Media Control Online
कायदेशीर आणि राजकीय लढाईसाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या एकनाथ शिंदे गटाने आता कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत आल्यावर ते राज्यपालांना भेटतील, असं ही बोललं जातंय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिस्चार्ज मिळाल्याने आता बंडखोर शिवसेना आमदारांचा शिंदे गट सक्रिय झाला आहे. आता बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. या आठवड्याच्या सुरवातीला म्हणजे एक दोन दिवसांत ते मुंबईत येऊ शकतात, असं बोललं जातंय. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आणि अजय चौधरी यांच्या गटनेतेपदी नेमणुकीवरील प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे मुंबईत येऊ शकतात असं बोललं जातंय.
Share Now