मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू : अरुण दुधवाडकर

विशेष वृत्त : अजय शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ :शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची आढावा बैठक कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्याची संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी शिवसेनेने आतापर्यंत अनेक बंडाचा सामना केला आहे, बंडखोर संपले मात्र शिवसेनेला कोणताच फरक पडला नाही, अडचणीच्या काळात ही संघटनेचा प्राण असलेले शिवसैनिक पक्षाच्यामागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास दुधवडकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *