विशेष वृत्त :अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील गांधी मैदान शेजारी असणारी संपर्क कार्यालयाची केबिन बेकायदेशीर असून ही केबिन तात्काळ हटवावी यासाठी शिवाजी पेठेतील शिवसैनिकांनी केबिन समोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेची परवानगी नसताना संबधित केबिन अनधिकृत रित्या बसवल्याचा आरोप करत जय भवानी जय शिवाजी आशा घोषणा दिल्या.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेल्यानंतर माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले.त्याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केल्यानंतर कोल्हापूर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे .पोस्टर फाडल्याप्रकरणी रविवारी इंगवले यांच्यासह दहा जनांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यानंतर इंगवले समर्थकांनी मुळात बेकायदेशीर केबिन बाहेर लावलेला बोर्ड देखील बेकायदेशीर असून हे केबिन तात्काळ हटवावे अशी मागणी केली
दरम्यान माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी बेकायदेशीर केबिन बाहेर लावलेला बोर्ड फाडल्याने माझ्यावर गुन्हा दाखल होतोच कसा? असा सवाल प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केला आहे . या पत्रकामध्ये निवृत्ती चौकातील जागेवर केबिन उभारण्यासाठी मी स्वतः महापालिकेकडे अर्ज केला होता मात्र आम्हाला परवानगी नाकारली आहे.त्यामुळे संबधित केबिन सह केबिन बाहेरील तो बोर्ड देखील हटवावे .परिणामी या केबिन शेजारी अन्य पक्षाचे केबिन उभ्या राहतील त्यास प्रशासनच जबाबदार राहील .त्यामुळे संबधित केबिन उभी करणाऱ्या लोकप्रतींधींवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी इंगवले यांनी केली आहे .