कोल्हापूर/प्रतिनिधी : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सोमवारी कोल्हापुरातील करीवर तालुका शिवसेनेच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला काळे फासून निषेध व्यक्त केला. करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आर के नगर चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले.
राधानगरी भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करत शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या निषेधार्थ भव्य यात्रा देखील काढण्यात आली. सोमवारी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने आर के नगर चौकामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह आबिटकर ,क्षीरसागर यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला काळे फासण्यात आले . यावेळी शिवसैनिकांनी या बंडखोर नेत्यांचा निषेध करत उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत असल्याच्या जोरदार घोषणा दिल्या.त्यानंतर पोस्टर ला जोडे मारत आपल्या संताप व्यक्त केला. यावेळी विराज पाटील यांच्यासह अनिल पाटील अरुण अब्दागिरी विवेक काटकर चंद्रकांत संकपाळ रणजित कोंडेकर
भगवान निर्मळ, पोपट खाडे, गोविंद वाघमारे,संदिप तोरस्कर, बाळू पटिल,संतोष सांदळे, अभि पोरे, संतोष ओतारी,आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.