नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची महापालिकेस भेट..

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सोमवारी महापालिकेस भेट दिली. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी यावेळी आयुक्त कार्यालयात जलसंपदा विभाग व महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. 

शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत दि.०३ जून २०२२ रोजी पुर्ण शहरासाठीची नव्याने अंतिम पुररेषा नकाशे प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये निळीरेषा, लालरेषा व पिवळीरेषा दर्शविणेत आलेली आहे. याबाबत उक्त पुररेषेच्या अनुषंगाने बांधकाम परवानगी, सुधारित बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र इत्यादी देणे संदर्भाने नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नगररचना यांना सुचना दिल्या. त्याचबरोबर शासनाचे निर्देशाप्रमाणे दि.१ जुलै २०२२ पासून संगणकीय प्रणालीव्दारे बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असून संगणक प्रणालीव्दारेच बांधकाम परवानगीचे अर्ज दि.१ जुलै २०२२ पासून स्विकारण्यात याव्यात. सर्व परवानगी प्रकरणे फक्त ऑनलाईन दाखल करून घेव्यात. दि.३०जून २०२२ अखेर प्राप्त होणारी ऑफलाईन प्रकरणे तात्काळ निर्गत करण्याच्या सुचना दिल्या.

Advertisements

  यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, सर्व अभियंते व सर्व्हेअर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *