विशेष वृत्त : जावेद देवडी
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२८ :महीलेचा मोबाईल हीसडा मारून चोरणाऱ्या आरोपींना शाहुपूरी पोलिसांकडून अटक आज अटक करण्यात आली. कोमल कोकरे ह्या दिनांक २३ रोजी रात्री ०९.२० चे सुमारास डयुटी संपल्या नंतर मोबाईल फोन वर बोलत घरी पायी चालत जात असताना त्या शहाजी लॉ कॉलेज चौक येथील हॉटेल पावणेर शाहुपूरी येथे आल्या असता त्यांचे पाठीमागुन मोटर सायकल वरुन आलेल्या तीन अज्ञात इसमा पैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यामहिलेच्या हातातील मोबाईल हॅन्डसेट जबरस्तीने हिसडा मारुन चोरुन घेऊन गेले.सदरचा घटना ही व्यापार पेठ येथे भरवस्तीत घटलेने सदर गुन्ह गांभीर्य पाहुन मा. शैलेश बलकवडे पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांनी सदर गुन्ह्याचा तातडीने तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो शहर विभाग कोल्हापूर व पोलीस निरीक्षक सो शाहुपूरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले व गुन्हे शोध पथक हे करीत होते.
सदर गुन्हा दाखल झालेनंतर तात्काळ घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने भेट दिली घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून घेतले होते. सीसीटीव्ही फुटेज गोपणीय बातमीदार यांना दाखवुन आरोपी यांचा शोध घेत असताना अज्ञात अज्ञात इसमापैकी एक इसक हा विचारेमाळ कोल्हापूर येथील असले बाबत गोपणीय माहिती मिळाली.गोपणीय माहितीच्या आधारे सदर इसमास ताबेत घेतले असता त्यांने प्रथम उडवाउवीचे उत्तेरे दिली. परंतु सदर गुन्हयाचा सखोल तपास केला असता सदर गुन्हयाची कबुली देवुन त्यांने त्याचे इतर साथीदार यांचे नावे सांगितली. त्या प्रमाणे त्यांना त्यांचे राहते गावातुन ताबेत घेणेत आले. सुरज उमेंद्र शिरोलीकर वय २० रा.विचारेमाळ कोल्हापूर, आकाश रमेश चोपडे व.व. २४ रा. पोर्ले तर्फे ठाणे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर,प्रशांत बबन पाटील व.व. २३ रा. केर्ले ता. करवीर जि. कोल्हापूर यांना सदर गुन्हयाचे तपास कामी ताबेत घेवुन सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देवुन गोन्हयातील चोरलेला सॅमसंग मोबाईल हॅन्डसेट काढुन दिला. तसेच त्यांनी गुन्हा करते वेळी वापरणेत आलेली हिरो स्पेंन्डर मोटरसायकल असा सुमारे ७५०००/- रु चा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
सदर कामगीरी ही मा. शैलेश बलकडे सो पोलीस अधिक्षक कोल्हापूर, मा. तिरुपती काकडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक कोल्हापूर मा. मंगेश चव्हाण सो उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर मा.राजेश गवळी, पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणे कडील गुन्हेशोध पथकाचे प्रमुख श्रीकांत इंगवले सहा पोलीस निरीक्षक, पोहेकॉ ऋषीकेश पवार, पो.ना.युवराज पाटील ,पो.ना. मिलींद बांगर, पो.कॉ. लखनसिंह पाटील, पो. कॉ. शुभम संकपाळ, पो.कॉ. सागर माने यांनी केली आहे.