विशेष वृत्त :अजय शिंगे
MEDIA CONTROL ONLINE
Advertisements

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना सोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले.

गेली अडीच वर्षे दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या या सर्वांसोबत एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असताना या सर्वांचे सहकार्य मोलाचे होते असे सतेज पाटील यांनी सांगितले. सर्वांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानून महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च अधिकारी ते विभागातील शेवटचा पोलीस कर्मचारी मन लावून आणि निष्ठेने काम करत असतात , म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांची जगभरात वेगळी ओळख आहे. असे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले.
