आज होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 35 Second

MEDIACONTROL ONLINE 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूर येथील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी पार पडणाऱ्या निवडणुकीनिमित्त शिवसेना आणि एकनाथ शिंदे याच्या गटात पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे, तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपसोबत आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहेत. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप प्रभू यांनी लागू केला आहे.

दुसरीकडे शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून विधिमंडळाचे गटनेतेपद हे अजय चौधरी यांना देण्यात आले आहे; पण हे बदल शिंदे गट मान्य करण्यास तयार नाही. आपल्याला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपणच शिवसेनेचे गटनेता असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गटनेते पद आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आधीच न्यायालयात गेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रभू यांचा व्हिप ऐकला नाही, तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार नार्वेकर यांना मतदान करणे शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *