शासकीय तंत्रनिकेतन येथे ज्वेलरी डिझाईनसाठी प्रवेश सुरू ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी – शासकीय तंत्रनिकेतन येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त विनाअनुदान तत्त्वावरील तीन वर्षांचा ज्वेलरी डिझाईन हा पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. करिअरच्या दृष्टीने वेगळे क्षेत्र असलेल्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य द. म. गर्गे व कोल्हापूर जिल्हा संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या एकत्रित प्रयत्नातून सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरीची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून पूर्वापार चालत आलेल्या सराफी व्यवसायाच्या उज्ज्वल परंपरेला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना केलेली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून या केंद्रामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त विनाअनुदान तत्त्वावर तीन वर्षांचा ज्वेलरी डिझाईन हा पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. दहावी उत्तीर्ण विदयार्थी या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी पात्र आहेत.

ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू होत असून ज्वेलरी डिझाईन, ज्वेलरी उत्पादन या संबंधित प्रगत तंत्रज्ञान, धातू शास्त्र व या व्यवसायाच्या अनुषंगिक सर्व बाबी तीन वर्षांमध्ये शिकवल्या जातील. अशा प्रकारचा अभ्यासक्रम शासकीय संस्थेत प्रथमच सुरू होत असून माफक शैक्षणिक शुल्क आहे.

Advertisements

पारंपरिक ज्वेलरी व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड मिळून अधिकाधिक कलाकुसरीचे दागिने, विक्री, नवनवीन संकल्पानांची जोड या व्यवसायाला मिळेल. तर हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला नोकरीच्या तर संधी तर मिळतील शिवाय स्वतःचा उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनेही वेगळे क्षेत्र आहे. अशा या क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने फक्त सराफ व्यवसातील नाही तर सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन अथवा कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही दोघांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *