Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
MEDIACONTROL ONLINE
राजेश क्षीरसागर यांनी मातोश्री हे आमचं मंदिर असून उद्धव ठाकरे त्या मंदिरात होते ते बरोबरच होतं. पण त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी केलं.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवेळी राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राजेश क्षीरसागर यांनी त्यांचा निर्णय मागं घेतला आहे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरेंविषयी मत व्यक्त केलं आहे. मातोश्री हे आमच्यासाठी मंदिर असून आमचा देव त्यातच हवा होता, असं क्षीरसागर म्हणाले.शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मातोश्री आमचं मंदिर असून एकनाथ शिंदे हे संकटमोचक आहेत, असं क्षीरसागर म्हणाले.
Share Now