Weather Updates: भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार नागरिकांना सावधानतेचा इशारा…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर 

सांगली/प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार ९ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: ८ जुलै पर्यंत रेड अलर्ट व ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत दि. ७ जुलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये ५ ते ६ फुटांची वाढ होऊन दिनांक ७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत किंवा आधी पाणीपातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भू:स्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *