Share Now
अभिजित निर्मळे
सांगली/प्रतिनिधी, दि.०७ : सांगली येथील पुष्पराज चौक जिल्हा मध्यवर्ती बँके जवळच्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे या मेन रोडवर मोठे खड्डे पडले असल्याने तसेच रस्त्यावर लाईट ची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांना रात्री खड्डे दिसून येत नाहीत त्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात. रस्त्याला लागून पाणी जाण्यासाठी गटार बांधलेली आहे पण गटार वरती व रस्ता खाली अशी परिस्थिती झाली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही आणि रस्त्यावर पाणी साचून राहत आहे त्यामुळे रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत संबंधित नगरसेवकांना येथील नागरिकांनी वारंवार सांगून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे या खड्ड्यांमुळे एखाद्या वाहन चालकाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Share Now