कोल्हापूर/प्रतिनिधी : केवळ सत्तेसाठी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, भाजपकडून केवळ सत्तेसाठी या अडीच वर्षांच्या काळात ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर शिवसेनेतच फूट पाडून भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली असली, तरी आजही सर्वसामान्य जनतेच्याही हृदयात उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदराचे स्थान कायम आहे.
शिवसेनेत फूट पाडण्याचे कारस्थान कोणी केले आणि कसे झाले, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे सर्व जुने शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. जिह्यात शिवसेनेची ध्येय्यधोरणे घरोघरी आणि गावागावात पोहोचवून नव्या जोमाने काम करून शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले
च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, पोपट दांगट, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, माजी आमदार सुरेश साळोखे, अवधुत साळोखे, मंजीत माने, जिल्हा महिला संघटक शुभांगी पवार, स्मिता मांडरे, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रीती क्षीरसागर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.