बानकर परिवार तर्फे धम्म जयंती व गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी…!

कोल्हापुर/प्रतिनिधी : सिद्धार्थ नगर कोल्हापूर येथील बानकर परिवार वतीने सर्व बहुजन व बौद्ध बांधवांना आज बुधवारी असलेल्या धम्म जयंती उत्सव, धम्म पौर्णिमा, उत्सव, धम्म क्रांती दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरू पौर्णिमा उत्सव व धम्म वर्षावास उत्सवाच्या हार्दिक मंगलकामना.

आज बानकर परिवार वतीने धम्मालय मध्ये वरील सर्व सण साजरे करणेत आले. यानिमित्त हिंदू डोंबारी समाजातील कार्यकर्ते तथा हर्षवर्धन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयु. रणजीत औंधकर व त्यांच्या पत्नी आयुनी उज्ज्वला औंधकर यांना निमंत्रित केले होते.त्यांच्या हस्ते बानकर परिवारचे गुरू गौतम बुद्ध, सम्राट अशोक राजा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमास दिपप्रज्वलन व पुष्प अर्पण करून वंदन केले.त्यानंतर सामुहिक पंचांग प्रणाम, त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. त्यांनंतर २५५० वी बौध्द धम्म जयंती अर्थात धम्म स्थापना दिन आयुनी उज्ज्वला व कु.अज्ञा देवदास बानकर यांच्या हस्ते कापून आनंद द्विगुणित केला. 

Advertisements

रणजीत औंधकर यांनी आपल्या मनोगतात दैनिक मुक्तनायक चे संपादक देवदास बानकर यांच्या माध्यमातून आज मला गुरू लाभलेचे सांगून त्यांच्या प्रास्ताविकमधून बुद्ध व धम्म सोप्या भाषेत समजलेचे सांगितले. संपादक बानकर यांनी आजच्या धम्मातील पौर्णिमाचे वैशिष्ट्ये कथन करुन गेले आठ वर्षे बानकर परिवार दोन व्यक्तीना निमंत्रित करून वर्षातील सर्व पौर्णिमा उत्सव हा सण साजरा करत असलेचे सांगितले. शेवटी धम्मपालन गाथेनंतर सामुहिक पुरण पोळी व सुजाता खरी भोजन ग्रहण केले.

वंदन प्रसंगी डावीकडून संपादक देवदास बानकर, पुनम दे.बानकर, रणजीत औंधकर व उज्ज्वला औंधकर. यावेळी सर्व उपासक व उपासकांनी एकमेकांना केक भरवून आजच्या धम्मातील सहा उत्सवांचा आंनद साजरा केला तो प्रसंग. धम्मालयमध्ये पंचशील ध्वज रोहण व लायटिंग केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *