Share Now
Read Time:1 Minute, 15 Second
प्रकाश कांबळे
कोल्हापूर/प्रतिनिधी : माजी आमदार नानासाहेब शांताराम माने वय ८६ यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. पुलोद सरकारच्या काळामध्ये १९७८ मध्ये ते पेठ वडगाव मतदार संघातून आमदार होते. तसेच शाहू जनता शिक्षण संस्थेचे चेअरमनही होते. मिसकलर्क या शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. त्यांचे पार्थिव जवाहर नगर येथील अहिल्या निवास येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून बारा वाजण्याच्या सुमारास पेठवडगाव येथील त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये अंत्यदर्शनानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांच्या कडून देण्यात आली.
Share Now