Weather Updates: पंचगंगेचे पाणी गायकवाड पुतळ्या जवळ…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१४ : मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी ११ :३० च्या सुमारास नदीचे पाणी संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्या जवळ पोहचले आहे. जस जसे पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे तसेच शहरवासियांची धाकधूक वाढत आहे.
कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून पुढे जाणार त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. महापालिका प्रशासन पुर्णपणे सतर्क असुन, नागरीकांच्या स्थलांतराची पूर्ण जवाबदारी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *