मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – जगातील प्रचंड मोठे आणि पृथीचे फुफुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन जंगल आग लागली. हि आग इतकी भयानक असून यामुळे या जंगलाच्या जवळ असलेल्या शहरात दिवसा धुरामुळे अंधार पडला आहे. हे जंगल पेटल्याने खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीची हानी होणार आहे.यामुळे सर्वांत मोठी हानी पर्यावरणाची झाली आहे. या आगीमुळे जैव विविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सध्या हि आग विझवण्याचे प्रयत्न अतोनात सुरु असून लवकरात लवकर हि आग आटोक्यात येणे आवश्यक आहे. यासाठी ब्राझीलसह या जंगलाचा समावेश होणाऱ्या देशानेही प्रयत्न सुरु केलेत.

पृथ्वीवर अधिक प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करण्यात या जंगलाचा अधिक वाटा आहे. तसेच या जंगलात अधिक मोठ्या प्रमाणात वनस्पती, जीव, जंतू,प्राणी आढळत आहेत. हे जंगल संशोधनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जात आहे.

या जंगलात अधिक प्रमाणात वृक्षतोड केली जात होती. हि वृक्षतोड रोखल्याने तेथील काहींनी जंगलाला आग लावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील पंधरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले आहेत.

या आगीमुळे अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोवर धुराचे ढग जमा झाल्याने भरदिवसा अंधार झाला आहे. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील सुमारे 2 हजार 700 किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररुप धारण केलं आहे.
