Weather Updates:पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांचे आवाहन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास
एसटी, बसेस देखील पाण्यात घालू नयेत, जेणेकरून दुर्घटना होणार नाही. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा..
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नागरीकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *