पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपयेने स्वस्त शिंदे सरकारचा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी, दि.१४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ निर्णय घेतले. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या काळातील पाच निर्णय शिंदे-फडणवीसांनी फिरवले आहेत. आगामी काळात राज्य सरकार जनतेला दिलासा देणारे निर्णय घेईल, असेही शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात नवीन सरकार आणखी कोणकोणते नवे निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Advertisements

पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग)

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबवण्यात येणार (नगर विकास विभाग)

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राज्यात राबवणार (नगर विकास विभाग)

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार(नगर विकास विभाग)

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.(ग्रामविकास विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *