कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१४ : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाहूपुरी व व्हिनस कॉर्नर परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यामुळे यावर्षी संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाय योजना करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी व व्हीनस कॉर्नर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
शाहूपुरीरीतील पंचमुखी गणेश परिसर, कुंभारगल्ली, रिलायन्स मॉलच्या मागील परिसरातील नागरिकांनी कचरा उठाव, औषध फवारणी व नालेसफाई बद्दलच्या तक्रारी सांगितल्या. या भागातील कचरा नियमित उचलला पाहिजे, कचरा कोंडाळ्यात कचरा साठणार नाही याची दक्षता घ्या, रोगराई पसरू नये यासाठी औषधाची वेळोवेळी फवारणी करा व नाला साफ करताना बाजूला ओढून लावलेला कचरा भरून न्या अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
व्हिनस कॉर्नर च्या मागील बाजूस असलेल्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या कचऱ्यामुळे पाणी रस्त्यावर येण्याची व नागरी वसाहतीमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो कचरा त्वरित काढून घ्यावा अशी सूचना दिली.
गाडीअड्डा येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दलदल झाली आहे. या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करून, पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. पाण्याची पातळी सतत वाढत आहे. यामुळे स्थलांतरित होण्याची तयारी करा. घरात पाणी शिरण्याचे वाट न पाहता, स्थलांतरित व्हा अशाही सूचना सुतारवाडा परिसरातील नागरिकांना दिल्या.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, पूजा नाईकनवरे, अमर समर्थ, रमेश पुरेकर, अमर देसाई, संभाजी पवार, रमेश नलवडे, महापालिकेचे बाबुराव दबडे, स्वप्नील उलपे, उमेश बागुल, अग्निशमन दलाचे तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, आदी उपस्थित होते.