भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर 

सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले आहे.त्यासाठी ते पुढे लवकरच काढून पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी निवेदन आयुक्तांना आठ दिवसांपूर्वी दिले होते.तसेच स्थायी समिती मधून ही काल मिटींगमध्ये नगरसेवकांनी आवाज उठविला होता पण अजूनही त्यावर ठाम निर्णय झाला नाही.आज त्याठिकाणी महापालिका कडून वसंतदादा स्मारक कडील तोडलेली लाकडे टाकली आहेत.ती पूर्ण भिजलेल आहेत तसेच ती ओबडधोबड आहेत.त्या मुळे शव जाळण्यासाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे .तरी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी केले.

Advertisements

आमचे मार्गदर्शक कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ आणि शेखरजी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग चे सर्व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून शव जाळण्यासाठी गॅसधायनी बसवले आहे त्याचा पण वापर करावा असै नागरीकांना आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *