Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व आमदारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार पी. एन.पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनी, आरोग्य विभाग, पाटबंधारे, महावितरण, जलसंपदा, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याकडून पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे रस्ते त्याचबरोबर शहरातील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग यावर पावसामुळे खड्डे पडतात. परिणामी हे खड्डे मुजविण्याकरीता निधीचे प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवा अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. पूर क्षेत्रातील गावांमध्ये पुरेशा अन्नधान्याची वाहतूक वेळेवर होईल याकडे लक्ष द्या. गावांना जोडणारे पूल सुस्थित ठेवा. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नव्याने पूल बांधणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा तसच पूर बाधित गावातील जनावरांचे स्थलांतर, चारा छावणी यासंदर्भात योग्य नियोजन करा. अशा सूचना त्यानी सबंधित विभागाला केल्या.कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी व पावसाळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात पूराचा धोका वाढलेला आहे. सद्या जिल्ह्यातील ६१ बंधारे पाण्याखाली गेले असून अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खालील बाबींबाबत शासनाकडून उपाययोजना व त्यावरील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी, जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला आ. पी.एन.पाटील, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. राजूबाबा आवळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व विभाग प्रमुख,अधिकारी उपस्थित होते.