Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिक खासदारांनी उचलेल्या पावलाविरोधात आक्रमक झालेत आहेत. आज सकाळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पोहोचले असता, संजय पवार यांना शिवसेनेची आताची परिस्थिती बघून भावना अनावर झाल्या. एकाबाजूला त्यांच्या बोलण्यात बंडखोरांविरोधात संताप होता, बदल्याची भावना होती, त्याचवेळी ठाकरे कुटुंबाविषयी आत्मीयता प्रेम जिव्हाळा होता. बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. त्यांना कोल्हापूरचे शिवसैनिक जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान त्यांनी खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना दिलं.
Share Now