Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२० : व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात दुपारी एक वाजता मिडीया कंट्रोल ने याचे वृत्त प्रसिध्द केले होते.
https://mediacontrol.in/?p=9600
प्रशासनाला माहिती मिळताच काही वेळेतच याची दखल घेऊन संबंधीत रस्त्यावरील दगड व मातीचा ढीग हटवून रस्त्याची सफाई करण्यात आली. मीडीया कंट्रोलच्या बातमीचे भागातील नागरिक,वाहनधारक आणि व्यापारी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
Share Now