प्रिकॉशन डोसचे १२३८ लाभार्थ्यांना लसीकरण…!

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत दिनांक १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवसांसाठी महापालिकेच्यावतीने १८ वर्षावरील पात्र सर्वांसाठी कोविड-१९ प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. बुधवारी १८ वर्षावरील पात्र १२३८ लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर २०, फ्रंट लाईन वर्कर १९, १८ ते ४४ वर्षापर्यंत ५३० नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. तर ४५ ते ५९ वर्षापर्यंत ४८८ नागरीकांचे व ६० वर्षावरील १८१ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण महापालिकेच्या 12 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी देण्यात आले आहे. १८ वर्षावरील ज्या लाभार्थींचे दुसरा डोस घेऊन ६महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रिकॉशन डोसचे लसीकरण देण्यात येत आहे. आजअखेर ४३,३२२ इतक्या हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षावरील व्याधीग्रस्त नागरीकांना प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

            बुधवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ११०, राजारामपूरी येथे २३८, पंचगंगा येथे १०७, महाडीक माळ येथे ८८, सदरबाजार येथे ५७, फिरंगाई येथे १५१, सिध्दार्थनगर येथे ६४, आयसोलेशन येथे १३९, कसबा बावडा येथे ५७, फुलेवाडी येथे ९६, मोरे माने नगर येथे १०८ व सीपीआर हॉस्पीटल येथे २३ नागरीकांना प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

Advertisements

            तरी महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडून लसीची उपलब्धता पाहता व पात्र यादीनुसार ज्या लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोसकरीता बोलाविण्यात येईल त्यांनी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर डोस घेण्यासाठी जावे. प्रिकॉशन डोसकरीता येताना सोबत आधार कार्ड व फोटा आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. अधिक माहितीसाठी 0231-2544295 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे विनाकारण केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *