Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी : शासन निर्देशानुसार दिनांक १५ जुलै २०२२ पासून आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत १८ वर्षावरील सर्वांसाठी शासकीय लसीकरण केंद्रांवर प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व दिव्यांग बांधवांकरीता प्रिकॉशन डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरीता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवार दिनांक २१ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत दिव्यांगांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी १८ वर्षावरील ज्या दिव्यांग बांधवांचा दुसरा डोस घेऊन ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्रिकॉशन डोसचे लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणास येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे
Share Now