नैसर्गिक जैवविघटनशिल पर्यावरणपूरक मुर्तींचा वापर करा-प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 50 Second

 

कोल्हापूर/प्रतिनिधी: नैसर्गिक जैव विघटनशील पर्यावरणपूरक मुर्तींचा वापर करा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दि.12 मे 2020 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेबाबत पी.ओ.पी. मुर्ती बंदीबाबत शहरातील मुर्तीकार संघटना व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडाळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रदिप मोरे, पर्यावरण समिती सदस्य उदय गायकवाड, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व संबधीत अधिकारी उपस्थित होते. सार्वजनीक गणेश उत्सवाकरीता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पी.ओ.पी. मुर्ती उत्पादनावर बंदी असल्याने व मुर्तीसाठी कोणताही विषारी रंग न वापरणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. मुर्ती करताना केवळ नैसर्गिक जैवविघटनशिल पर्यावरणपूरक जसे की पारंपारिक मातीच्या व शाडूची मुर्ती यांचा वापर करावा. यासाठी मुर्तीकारांना प्रोत्साहन देणेबाबत व जनजागृती होणेबाबत हि बैठक घेण्यात आली.

पर्यावरण समिती सदस्य उदय गायकवाड यांनी शहरातील मुर्तीकारांनी मुर्तींना घातक रंगाचा वापर न करता वॉटर रंग जसेकी नैसर्गिक रंग यांचा वापर करावा.  यामुळे मुर्ती विसर्जन कुंड अथवा खणीमध्ये सोडल्यानंतर पाण्याचे प्रदूषण होणार नाही. नदी व तलावाचे प्रदुषण रोखण्यासाठी थेट नदीमध्ये व तलामध्ये मुर्ती विर्सजन करण्या ऐवजी या मुर्ती विसर्जन कुंडामध्येच करुया. शाडूच्या मुर्त्या विर्सजन केलेनंतर त्या मातीचा पुर्नवापर करण्यासाठी कुंभार समाजास आवाहन केले. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरामधील नदीचे व तलावाचे प्रदुषण रोखण्यासाठी जास्तीजास्त शाडूच्या मातीच्या मुर्त्या बनविण्यास प्राधान्य देण्यात यावे. यासाठी नागरीकांमध्ये प्रबोधन करावे. कुंभार समाजाने शहरामध्ये यावर्षी नोंदणी झालेल्या मुर्तींची संख्या महापालिकेस कळावावे. जेणेकरुन विसर्जनाबाबत विसर्जन कुंडाचे नियाजन महापालिकेस करता येईल असे सांगितले.

            यावेळी उप-आुयक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, माजी महापौर मारुतराव कातवरे, कुंभार समाजाचे प्रकाश कुंभार, मुर्तीकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी माजगांवकर, एकनाथ माजगांवकर, लक्ष्मण वडणगेकर व मुर्तीकार उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *