Getting your Trinity Audio player ready...
|
MEDIACONTROL ONLINE
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत होती. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४ हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या २४ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.
मुर्मू यांच्या विजयानंतर भाजप देशभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दिल्लीत विजय रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. दिल्लीतील रॅलीचं नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा करणार असून यावेळी ते भाषणही करणार आहेत. यावेळी तब्बल २० हजार लाडूंचं वाटप केलं जाणार आहेत.