शिवसेनेला धक्का : संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी…

संजय राऊत यांना न्यायालयानं ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.संजय राऊत यांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. रविवारी दिवसभराच्या चौकशीनंतर ई़डीनं त्यांना संध्याकाळी ताब्यात घेतलं होतं.त्यानंतर आज दुपारी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आलं. कोर्ट परिसरात येताना संजय राऊत लोकांकडे पाहून ‘जय महाराष्ट्र’ म्हणाले.संजय राऊतांच्या रिमांडवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला.

ईडीच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद-

Advertisements

*प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होता त्याला HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे.

*अलिबागची जमिन याच पैशातून खरेदी करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात. थेट आर्थिक फायदा झालाय.

*प्रविण राऊत फक्त नावाला होता. तो संजय राऊत यांच्यावतीनं सर्व व्यवहार करत होता.

*मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले.

*संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.

*रात्री १०.३० नंतर चौकशी करणार नाही

राऊतांच्या बचावात वकिलांचा युक्तिवाद –

*संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे.

*या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का नाही कारवाई केली कारण ही कारवाई राजकीय हेतूनं करायची होती.

*संजय राऊत हार्ट रुग्ण आहेत. त्यांच्याशी उशीरा चौकशी करू नये.

*राऊतांची चौकशी सुरू असताना वकीलांना उपस्थित राहू द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *