कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आज प्रामुख्याने सर्वप्रथम डिजिटल मीडिया प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. आज डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रमुख बलकवडे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्ह्यातील विविध घटनांचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
भविष्यात डिजिटल मीडिया आणि पोलीस प्रशासन एक होऊन जिल्ह्यातील अनेक वाईट गोष्टींना हद्दपार करू शकते व भयमुक्त कोल्हापूर निर्माण होऊ शकते असा आशावाद पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य- प्रमोद मोरे, जिल्हाध्यक्ष- सुहास पाटील, शहराध्यक्ष -प्रशांत चुयेकर, जिल्हा सचिव -प्रा.मदन अहिरे, सह सचिव अजय शिंगे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख -वैभव प्रधान ,महान्यूजचे रितेश पाटील,एम.ए.पठाण, अझरुद्दीन मुल्ला, आदी. पदाधिकारी उपस्थित होते.