गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएस कडे वर्ग….!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 40 Second

विशेष वृत्त अजय शिंग 

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ३ : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची सात वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे त्यांच्या घरासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.अद्यापही या हत्येमागे कोण होते याचा छडा लागलेला नाही, यावर पानसरे कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन पानसरेंना न्याय मिळावा अशी मागणी पानसरे कुटुंबीय करत आहे.कॉ. गोविंद पानसरे हत्येचा तपास महाराष्ट्र CID च्या विशेष तपास पथकाकडून SIT काढून, ATS ला देण्यात यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. ती आता मान्य करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणातल्या काही तपास अधिकाऱ्यांची आता एटीएसमध्ये बदली करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.

या याचिकेवर सुनावणी करताना, बॉम्बे हायकोर्टाने गोविंद पानसरे हत्याप्रकरणी २०२० पासून तपासात काय निष्पन्न झालं याचा रिपोर्ट देण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. तपास एटीएसकडे देण्याची पानसरे कुटुंबियांनी मागणी केली होती. पानसरे हत्येचा तपास आता एसआयटी कडून एटीएस कडे वर्ग होणार आहे. न्यायालयाच्या आदेशावर पानसरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. लवकरात लवकर हत्या प्रकरणाचा छडा लागण्याची आशा व्यक्त केली. यावर मेघा पानसरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तपासात प्रगती नसताना खटला सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.याचा खटल्यावर तपास होऊ शकला असता. त्यामुळे तपास यंत्रणा बदलण्याची मागणी अभय नेवागी याच्या सूचनेनुसार केली २२ एप्रिल २०२२ ला केली होती. नालासोपारा केस मध्ये एटीएसने मोठा तपास केलाय ज्यात काही हिंदुत्ववादी लोकांच्या घरी शस्त्रसाठा सापडला होता.दाभोलकर पानसरे मधले काही आरोपी पकडले होते त्यामुळे एटीएसचा आधीपासूनच तपासात संबंध आहे”, असं त्या म्हणाल्या आहेत.

“तपासात प्रगती नसताना खटला सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.याचा खटल्यावर तपास होऊ शकला असता. त्यामुळे तपास यंत्रणा बदलण्याची मागणी अभय नेवागी याच्या सूचनेनुसार केली २२ एप्रिल २०२२ ला केली होती. नालासोपारा केस मध्ये एटीएसने मोठा तपास केलाय ज्यात काही हिंदुत्ववादी लोकांच्या घरी शस्त्रसाठा सापडला होता.दाभोलकर पानसरे मधले काही आरोपी पकडले होते त्यामुळे एटीएसचा आधीपासूनच तपासात संबंध आहे. आरोपी पकडण्यात त्याचा उपयोग होता.एसआयटी ची रचना बरोबर नव्हतं.एक पूर्ण वेळ टीम देण्याची मागणी वारंवार केली मात्र मान्य झाली नाही. तपास अधिकारी बदलत होते. सरकारची इच्छा असते तेव्हा तपास लागलात. पानसरे हत्येचा तपास लागत नाही आरोपी पकडले जात नाही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.आजच किंवा या आधीच सरकार वेळोवेळो संबंधितांना भेटलो.राजकीय इच्छा असतेच तेव्हाच तपास होतो.इथून पुढे हा तपास गांभीर्याने होईल अशी अपेक्षा आहे. खटला सुरू करायला आमची हरकत नाही. खून म्हणजे मोठ्या कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे खटला सुरू असला तरी तपास सुरू राहावा अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली होती”, असं मेघा पानसरे म्हणाल्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *