भारती फाउंडेशन कोल्हापूर आणि समजासेवक नंदकुमार पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १४/०८/२०२२ रोजी भारती फाउंडेशन कोल्हापूर आणि समजासेवक नंदकुमार पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल कारेकर म्हणाल्या की समाजसेवक नंदकुमार पिसे यांच्या उपस्थीती मध्ये होत असलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये १०००/, शालेय साहित्य,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरिण्यात येणार आहे. हि स्पर्धा तीन गटात होणार असून 

पाहिला गट इयत्ता पहिली ते चौथी,

दुसरा गट पाचवी ते सातवी,

तिसरा गट आठवी ते दहावी,

अशा तीन गटात हि स्पर्धा विभागली गेली आहे.पहिल्या आणि दुसऱ्या गटासाठी हि स्पर्धा ओपन असणार आहे तर तिसऱ्या गटासाठी विषय दिले जाणार आहेत.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला रोख रुपये १०००, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला ७५०, तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला रोख रुपये ५०० चे बक्षीस देण्यात येणार आहे. या भव्य चित्रकला स्पर्धेत ५०० पेक्षा जास्त विध्यार्थी सहभागी होतील अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल कारेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.ही स्पर्धा रविवार दिनांक १४ रोजी सकाळी ९:०० वाजता, गांगाई लॉन, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर येथे होणार आहे. 

स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ स्नेहल कारेकर यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्षा रिना सनगत, सेक्रेटरी शिला कुपटे, खाजनिस प्रियांका पाटील, प्रिन्सिपल मनीषा इंगवले, अंजना तुंगे,प्रियंका चौगुले, स्वरा माने आदी सहकारी उपस्थीत होते.

स्पर्धेत सहभागी आपले नाव नोंदवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा..

संपर्क – मो. ९१७५०५७४६५/९७६६१५५५६६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *