कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ३ :महानगरपालिकेने कोवीड लसीकरण कामाअंतर्गत दिलेल्या योगदानाबद्दल राज्याचे संचालक डॉ.नितीन आंबर्डेकर यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम राज्य लसीकरण अधिकारी डॉ.सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मंगळवारी व बुधवारी राज्यस्तरीय लसीकरण आढावा बैठक व कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.अमोल माने व अमोल महाडीक यांनी गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र स्विकारले. दि.१६ जानेवारी २०२१ पासून महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोवीड लसीकरणास सुरवात झाली. सुरवातीला हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंन्ट लाईन वर्कर्स, ६० वर्षावरील व्याधीग्रस्त नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर टप्याटप्याने या मोहिमेमध्ये १८ वर्षावरील नागरीकांचा, १५ ते १८ व १२ ते १४ वर्षावरील मुलांचा सहभाग करण्यात आला. हि मोहिम प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनपुर्वक व शिस्तबध्द पध्दतीने सुरु आहे. हि लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी, सर्व वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्सेस, आशा वर्कर्स, ए.एन.एम यांचेसहकार्य लाभले आहे.
कोवीड लसीकरण योगदानाबद्दल महापालिकेचा गौरव…!
