एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झालेले बंडखोर खासदार संजय मंडलिकांच्या घरावर मोर्चा…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोनं म्हणणारे तसेच बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक यांनी शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यामध्ये संतप्त पडसाद उमटले होते. निवडून आले सहा मतदारसंघातून आणि निर्णय घेतला कागलमधून अशीही टीका त्यांच्यावर झाली. आता याच बंडखोर संजय मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे. 

Advertisements

या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह मतदारही सहभागी होतील, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. मंडलिक यांच्या निवासस्थानावर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गद्दारीबद्दल मंडलिकांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या जनतेचा भावनांना तडा दिला. त्यांना जाब विचारण्यासाठी निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघेल. 

या मोर्चाला शाहूपुरी जिमखाना येथून मोर्चाला प्रारंभ होणार होऊन तो शिवाजी पार्क येथील मंडलिकांच्या निवासस्थानावर धडकेल. कोल्हापूरची जनता खासदार मंडलिक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे संजय पवारांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *