जिल्हा बँकेसह गोकुळ’मध्ये सत्तांतराचे स्वप्न पाहू नये -हसन मुश्रीफ…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 47 Second

विशेष वृत्त शिवाजी शिंगे 

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुरुवार रोजी  कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.  खासदार धनंजय महाडिक यांची खाजगीत भेट झाली तर मी त्यांना समजावून सांगेल. या दोन्हीही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना समजावून सांगेन. त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत, असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

गोकुळ आणि जिल्हा बँकेत सतीश पाटीलच नाहीतर हसन मुश्रीफ सुद्धा घटक – आमदार मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाची सत्ता याबाबत केलेला दावा मी प्रसारमाध्यमांमध्ये वाचला आणि बघितला. खासदार धनंजय महाडिक यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. मात्र, या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील. केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नाही. कारण वरती जरी सत्ता बदल झाला असला तरी ही सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातील आहेत. परखी माणसं नाहीत. निवडून आलेले जे संचालक आहेत. त्यांच्यासाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

कारखान्यांना हा बोजा उचलावा लागत आहे – सर्व कारखाने व बँकांची माहिती घेतली तर अनेक कारखान्यांचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना प्रबळ असल्याने चार कारखान्याची कोंडी होते आणि यामुळेच बाकीच्या कारखान्यांनाही एक रकमी एफआरपी द्यावी लागते. साखर दीड ते दोन वर्ष कारखान्यामध्ये पडून असती. मग पैसे कुठून देणार आणि व्याजाने तरी पैसे काढून किती देणार असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच, आजूबाजूच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये एक रकमी एफ आर पी दिलीजात नाही. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना हा बोजा उचलावा लागत आहे. हे आम्ही शेतकरी संघटनेच्या लोकांना अनेक वेळा समजावून सांगितले. तसेच, यामुळे शेतकऱ्याचे देखील नुकसान होत आहे हे त्यांना सांगितले असल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *