‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन : जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 0 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्यांमध्ये अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले असून ही दौड दहा किलोमीटर इतकी असणार आहे.

 तसेच पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार यांची चंदगड ते पन्हाळा मार्गावर सायकल फेरी होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध घटक मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती शैलेश बलकवडे यांनी दिली.

 ‘आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या सर्व वीरांचे स्मरण करण्याची ही संधी असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यात आपला सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन शैलेश बलकवडे यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *