कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 8 Second

कोल्हापूर : देशात दिवसागणिक सुरु असलेला महागाईचा आगडोंब आणि वाढत चाललेली बेरोजगारी तसेच ईडीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विरोधकांवरील कारवाईवरून काँग्रेसने आज देशव्यापी एल्गार केला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसने रस्त्यावर उतरताना मोदी सरकारचा निषेध करताना चलेजावच्या घोषणा दिल्या.

कोल्हापुरात  देखील काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोदी सरकार चलेजावच्या घोषणा दिल्या.

केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतले.

याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *